कांदळवन हा वनस्पतींचा एक विशेष गट आहे. ज्यामध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती किंवा वेली, जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. कांदळवने भरती-ओहोटी दरम्यानच्या कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात. जगातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातील (जवळजवळ ३२° उत्तर आणि ३८° दक्षिण दरम्यान) किनारपट्टी प्रदेशात सापडणारी ही झाडे धोकाग्रस्त असूनही ती सर्वात उत्पादनक्षम अशी परिसंस्था निर्माण करतात. ही परिसंस्था आता अनेक खंडांमध्ये समशीतोष्ण प्रदेशात विस्तारत आहे.
कांदळवनांची घनता समुद्राचे पाणी आणि गोडे पाणी यांची नियमित सरमिसळ होणाऱ्या भागात, २०० सेमीपेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडणार्या भागात, २०° पेक्षा कमी तापमान नसणाऱ्या तसेच तापमानातील बदल ५° पेक्षा जास्त नसणाऱ्या भागात अधिक चांगली दिसून येते.
१) कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा / संस्था / अधिकारी यांच्या अधिकार व जबाबदाऱ्यांचा तत्पर व परिणामकारक वापर करुन घेणे व सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवणे.
२) कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन तसेच बाधीत क्षेत्रावर तज्ञाच्या सल्ल्याने कांदळवनांची पुन:स्थापना (Restoration) करणे.
३) कांदळवनासंदर्भात तक्रारी व तक्रारींचे निराकरण यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह एक स्वतंत्र सेक्रेट्रिएट तयार करणे.
४) कांदळवन क्षेत्रात भारतीय वन अधिनियम, १९२७, वन (संवर्धन) अधिनियम, १९८० व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ चा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे.
५) समितीच्या मासीक मा.उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणी बाबतच्या कामाचा आढावा घेणे. तसेच सदर बैठकींचे इतिवृत्त विभागीय आयुक्त, कोंकण यांच्या संकेतस्थळावर किंवा समर्पित संकेतस्थळावर (dedicated website) प्रसिध्द करणे.
६) राज्यातील संवेदनशिल कांदळवन क्षेत्र निश्चित करणे व सदर क्षेत्रावर पोलीस यंत्रणा/ वनरक्षक/ महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत निगरानी (surveillance) ठेवणे.
७) संवेदनशिल कांदळवन क्षेत्रात वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे.
१०) संवेदनशिल कांदळवन क्षेत्रास बाधा पोहचविण्याऱ्या उपद्रवींवर निगरानी ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही बसविण्याबाबत निर्णय घेणे.
११) राज्यातील कांदळवन क्षेत्राचे दर सहा महिन्यांनी उपग्रहाद्वारे उच्च पृथ्थकरण (Satellite high resolution images) वापरुन नकाशे तयार करुन घेणे व त्यानुसार काही बदल आढळून आल्यास तो समितीने विचारात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
१२) समितीने केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रथम अनुपालन अहवाल मा. उच्च न्यायालयास दिनांक १ डिसेंबर,२०१८ पूर्वी सादर करणे व त्यानंतर प्रत्येक ३ महिन्यांनी सादर करणे.
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 87/2006 मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व सागरतटीय जिल्ह्यांकरिता कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सनियंत्रण समिती पुढील प्रमाणे गठीत करण्यात येत आहे.
अ.क्र. | अधिकाऱ्याचे पदनाम | समितीतील स्थान |
---|---|---|
1 | विभागीय आयुक्त कोंकण विभाग , नवी मुंबई. | अध्यक्ष |
2 | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई. | सह अध्यक्ष |
3 | पोलीस आयुक्त मुंबई / ठाणे / नवी मुंबई यांचे प्रतिनिधी | सदस्य |
4 | पोलीस अधिक्षक, ठाणे (ग्रामीण) / रायगड / पालघर / रत्नागिरी / सिंधुदुर्ग यांचे प्रतिनिधी ( पोलीस उप अधीक्षक व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी ) | सदस्य |
5 | आयुक्त, महानगरपालिका बृहन्मुंबई / ठाणे / कल्याण डोंबिवली / मिरा - भाईंदर / वसई - विरार / नवी - मुंबई / पनवेल /भिवंडी - निजामपूर /उल्हासनगर यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी ) | सदस्य |
6 | मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ), ठाणे | सदस्य |
7 | मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ), कोल्हापूर किंवा त्यांचे प्रतिनिधी (विभागीय वन अधिकारी व त्यावरील दर्जाचे अधिकारी ) | सदस्य |
8 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) चे प्रतिनिधी | सदस्य |
9 | शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) चे प्रतिनिधी | सदस्य |
10 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA ) चे प्रतिनिधी | सदस्य |
11 | झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांचे प्रतिनिधी | सदस्य |
12 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांचे प्रतिनिधी | सदस्य |
13 | सदस्य सचिव, महाराष्ट्र सागर तटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) | सदस्य |
14 | जिल्हाधिकारी मुंबई / मुंबई उपनगर / ठाणे / रायगड / पालघर / रत्नागिरी / सिंधुदुर्ग | सदस्य |
15 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी | सदस्य |
16 | उप वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई. | सदस्य सचिव |
17 | विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक | सदस्य |
18 | नवी मुंबई एन्व्हारमेंट प्रिझर्वेशन सोसायटी यांचे प्रतिनिधी | सदस्य |
19 | बॉम्बे एन्व्हरमेंट ऍक्शन ग्रुप यांचे प्रतिनिधी | सदस्य |
20 | वनशक्ती (NGO) यांचे प्रतिनिधी | सदस्य |
21 | महाराष्ट्र मच्छीमार कृती संघ यांचे प्रतिनिधी | सदस्य |
22 | संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी | सदस्य |